सलमान म्हणतो… माझ्या पाच गर्लफ्रेंड झाल्या पण मी आजही वर्जिनच

7616

बॉलिवूडचा दबंग खान सलमान हा कायम वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत असतो. बॉलिवूडमधला मोस्ट एलिजेबल बॅचलर असलेला सलमान खान याचे लव्ह अफेयर्सही तितकेच चर्चेत राहिले आहेत. मात्र नुकताच सलमानने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. सलमान खान याने तो अजुनही वर्जिन असल्याचे सांगितले आहे. बिग बॉसच्या स्टेजवरून त्याने याबाबत सांगितले.

तान्हाजी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण व काजोल बिग बॉस 13 च्या सेटवर आले होते. त्यावेळी काजोलने अजय व सलमानकडून सत्य बाहेर काढून घेण्याचा टास्क खेळला. यावेळी सलमानने त्याच्या 5 गर्लफ्रेंड झाल्या आहेत मात्र अजुनही तो वर्जिन असल्याचे सांगितले. सलमानने असे सांगताच स्टेजवर एकच हशा पिकला. त्यावर काजोलने मला हे बिलकूल खरे वाटत नाही असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या