समग्र समर्थ साहित्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समर्थ रामदास स्वामींचे अप्रकाशित साहित्य सुमंगल प्रकाशनतर्फे 1998 मध्ये समग्र समर्थ साहित्य या ग्रंथरूपात उपलब्ध करण्यात आले होते. नुकतीच या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या सुधारित आवृत्तीचे वैशिष्टय़ म्हणजे, ग्रंथाच्या शेवटी समाविष्ट करण्यात आलेल्या परिशिष्टांमध्ये समग्र समर्थ साहित्य या ग्रंथातील ओव्या अकारानुक्रमे देण्यात आल्या आहेत. रामदास स्वामींच्या साहित्याचे अभ्यासक-संशोधक यांच्यासाठी ही सुधारित आवृत्ती उपयुक्त ठरेल.1995 पासून नागपूर विद्यापीठाच्या डॉ. मधुकर जोशी यांनी संशोधन करून या ग्रंथाचे संकलन आणि संपादन केले आहे. 1998 मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ आता 23 वर्षांनी ‘कालनिर्णय’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नुकताच पुनर्पकाशित केला आहे.