सहकार महर्षी सुवालालजी आनंदरामजी गुंदेचा यांचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | नगर

समाजभूषण प्राप्त व सहकार महर्षी सुवालालजी आनंदरामजी गुंदेचा (वय ८४) यांचे नगर येथील खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री उशीरा निधन झाले. सुवालालजी हे गेल्या ६ महिन्यांपासून आजारी होत.

त्यांच्या पश्च्यात ३ मुली , २ मुले, नातू , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नालेगाव, अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नगर अर्बन बँकेचे सलग ४८ वर्ष संचालक व १२ वर्ष चेअरमन , जैन ओस्वाल पंचायत सभेचे २५ वर्ष अध्यक्ष , जैन वात्सल्य संस्था व जैन धर्मशाळेचे सुमारे 30 वर्ष अध्यक्ष , अहमदनगर जिल्हा बँक्स असो.चे अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य बँकिंग फेडरेशनचे अध्यक्ष , कॉंग्रेस पक्ष व विविध संस्थेत ते कार्यरत होत. सुवालालजी गुंदेचा यांनी २००० साली जैन ओस्वाल पथसंस्थेची स्थापना केली होती .