Video – कुमारच्या आयुष्यातली ती महिला कोण? समांतर-2 चा ट्रेलर प्रदर्शित

कुमारच्या आयुष्यात ती महिला कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता समांतरच्या दुसर्‍या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ती महिला कोण याचा सस्पेन्स संपला आहे.

13 मार्च 2020 रोजी समांतरचा पहिला सीजन एमएक्स प्लेअर वर प्रदर्शित झाला होता.  स्वप्नील जोशी, नितीन भारद्वाज, तेजस्विनी पंडित अशी तगडी स्टारकास्ट या सीरीजमध्ये आहे. सुहास शिरवळकर यांच्या समांतर कांदबरीवर आधारित ही वेबसीरीज असून सतीश राजवाडे यांनी या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. तर कुमार महाजनच्या आयुष्यात आलेल्या महिलेची भुमिका सई ताम्हणकरने वठवली आहे. आता कुमारच्या आयुष्यात काय घडणार, निखिल चक्रपाणिच्या भूतकाळातून कुमार धडा घेणार का  या प्रश्नांची उत्तरं 1 जुलै रोजी प्रेक्षकांना मिळणार आहे. एम एक्स प्लेयर वर 1 जुलै गुरूवारी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या