संभाजी भिडे गुरुजींविरोधातील सहा गुन्हे मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगावमधील हिंसाचार प्रकरणी आरोप करण्यात आलेले हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधातील दंगलीचे सहा गुन्हे मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजप सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भिडे गुरुजी यांच्यासह कार्यकर्त्यांवरील गुन्हे देखील मागे घेण्यात आल्याचे समजते.

माहिती अधिकारातून ही माहिती समोर आलेली असून राज्य सरकारने या संदर्भात एकूण आठ परिपत्रक जारी केली आहेत. २००८ साली जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यकर्त्यांवर मालमत्ता नासधूस केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.