३२ मण सोन्याच्या सिंहासनासाठी भिडे गुरुजींचे धारकऱ्यांना मार्गदर्शन

21

सामना ऑनलाईन, नगर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावरील सिंहासन ३२ मण सोन्यात घडवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी संभाजी भिडे गुरुजी राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असून आज ते नगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील दिशा आखून दिली. हे सिंहासन पूर्ण व्हावे यासाठी नगर शहरामध्ये चार तुकड्या करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक तुकडीमध्ये २ हजार लोकांचा समावेश असणार आहे. या कामाला तातडीने सुरूवात करण्याचे आवाहन यावेळी भिडे गुरुजींनी केले.

४ जून २०१७ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सोन्याचे सिंहासन बसविण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. आजवर अनेकांनी महाराजांविषयी पोवाडे लिहिले, चित्रपटे काढले, आता आपल्याला सिंहासन स्थापन करायचे आहे असे भिडे गुरुजी म्हणाले आहेत. नगर शहरातील महेश मंगल कार्यालयामध्ये त्यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या