
शहरात आज सकाळी आणखी 9 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता शहरातील बाधितांची संख्या 291 वर पोहोचल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी दिली.
या नव्याने आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये किलेअर्क भागातील1, चिकलठाणा येथील सावित्री नगरातील 1, पुंडलीकनगर भागातील 2, जयभीमनगर घाटी भागातील 3 आणि नंदनवन कॉलनीतील 1 अशा 9 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा देवळाई येथील 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या 10 वर पोहोचली आहे.






























































