इतकी असंवेदनशीलता कुठून येते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळीपाठोपाठ गारपिटीने शेतकऱयाला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार किंवा कृषी मंत्री साधे धीर देताना कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. शेतकरी जगला तरच तुम्ही जगाल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात अवकाळीसोबतच गारपीटही मोठय़ा प्रमाणात झाली आहे. मराठवाडय़ासह राज्यातल्या इतर भागांत शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱयावर आभाळच कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून राज्य सरकारला इशारा दिला आहे.