आधी पतीचे गुप्तांग कापले, मग स्वत: प्यायली अ‍ॅसिड; मेव्हण्याच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून  वाद झाला. आणि संतापलेल्या पत्नीने धारदार शस्त्राने पतीचे गुप्तांगच छाटले. त्यानंतर ती स्वतः अ‍ॅसिड प्यायली. यामुळे दोघांची प्रकृती बिघडली . म्हणून दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र यावेळी अनेक धक्कादायक खुलासे झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अस्मोली पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात 21 मे च्या रात्री घडली. अचानक पत्नी पत्नीमध्ये शुल्लक कारणांवरून वाद झाला. हे भांडण इतके वाढले की पत्नीला तिचा राग अनावर झाला. आणि तिने नवऱ्याचे गुप्तांग कापले. यानंतर ती स्वत: अॅसिड प्यायली. यामुळे दोघेही प्रकृची बिघडली आणि याच गंभीर अवस्थेत  त्यांना मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, ही घटना होऊन तब्बल सहा दिवस उलटून गेल्यानंतर या प्रकरणाला एक नवीन वळण लागले. सोमवारी, पीडित पतीने पत्नीविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. त्याच वेळी, महिलेच्या भावानेही हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याबद्दल आणि बहिणीला मारहाण केल्यानंतर जबरदस्तीने अ‍ॅसिड पाजल्याबद्दल तिच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार नोंदविल्यांमुळे पोलीस आता पेचात पडले आहेत. म्हणून या प्रकणाची  पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच त्यांनी पती-पत्नीचे जबाब नोंदवले जात आहेत.

सध्या दोघांचीही प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच सत्य बाहेर येईल आणि कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पती-पत्नीची सतत चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.