
सामना ऑनलाईन ,मुंबई
समीर दिघे याने शुक्रवारी मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मुंबई संघाला गेल्या मोसमात प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे कदाचित समीर दिघेने प्रशिक्षकपदावरून माघार घेतली असावी अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली असली तरी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे समीर दिघेकडून यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) समीर दिघेसोबत एक वर्षाचा करार केला होता. मात्र यापुढेही प्रशिक्षकपदावर कायम राहणार का, असा प्रश्न एमसीएकडून विचारण्यात आला होता. पण समीर दिघेने नकार दिल्यामुळे आता मुंबई क्रिकेट संघाला आगामी मोसमासाठी नवा प्रशिक्षक शोधावा लागणार आहे.


























































