
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्यापासून पाकिस्तान पिसाळला आहे. गुरुवारी पाकिस्तानने आणखी एक निर्णय घेत दोन्ही देशांतील मैत्रिचा दुवा असणारी ‘समझौता एक्सप्रेस’ रोखली असून कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
Pakistan suspends Samjhauta Express services, says Pakistan media. pic.twitter.com/JzsWJzbeBA
— ANI (@ANI) August 8, 2019
गुरुवारी पाकिस्तानकडून ‘समझौता एक्सप्रेस’ हिंदुस्थानमध्ये येणार होती. परंतु पाकिस्तानने ती रोखून धरली आहे. ड्रायव्हर आणि गार्डलाही माघारी बोलावण्यात आले आहे. ही सेवा कायमची बंद करण्याची आल्याची माहिती पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी दिली आहे.
Pakistan Railways Minister Sheikh Rashid Ahmed: In a decision by the Railways Ministry, Samjhauta Express services have been permanently stopped. It used to ply twice a week. The people who had already purchased their tickets can get their money reimbursed from Lahore DS office. pic.twitter.com/ZVNOTEsQRZ
— ANI (@ANI) August 8, 2019
अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकावरील प्रमुख अरविंद गुप्ता यांनी याबाबत बोलताना सांगितले की, गुरुवारी पाकिस्तानमधून ‘समझौता एक्सप्रेस’ हिंदुस्थानमध्ये येणार होती. परंतु आता पाकिस्ताकडून संदेश आला आहे की हिंदुस्थानने आपला ड्रायव्हर, क्र्यू मेंबर आणि गार्डला पाठवाला आणि एक्सप्रेस घेऊन जावी. पाकिस्तानने सुरक्षेच्या दृष्टीने हा पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या रेल्वेमध्ये हिंदुस्थानमधील काही नागरिक असण्याची शक्यता आहे.
बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक घेतली आणि काही मोठे निर्णय घेतले. पाकिस्तानने हिंदुस्थानसोबतचे सर्व राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेतला, तसेच व्यापारही थांबवला आहे. कलम 370 चा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणार असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान 15 ऑगस्टला काळा दिवसही पाळणा आहे.



























































