Samsung Galaxy M21 हिंदुस्थानात लॉन्च, दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा; वाचा सविस्तर…

जगातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सॅमसंग या कंपनीने आपला नवा स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M21 हिंदुस्थानच्या बाजारात लॉन्च झाला आहे. सॅमसंगच्या प्रसिद्ध M सिरीजमधील हा फोन आहे.

screenshot_2020-03-18-17-33-11-802_com-android-chrome

Samsung Galaxy M21 स्मार्टफोन मध्ये 6,000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. यासह पाठीमागच्या बाजूला 3 कॅमेरे देण्यात आले आहेत. पाठीमागच्या बाजूचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असणार आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्या ग्राहकाला हा फोन नक्की आवडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. Samsung Galaxy M21 ची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनची विक्री 23 मार्चला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

अन्य वैशिष्टय –

 • किंमत 12,9999 रुपये
 • दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध
  1. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज
  2. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज (किंमत जाहीर करण्यात आलेली नाही)
 • मिडनाइट ब्लू आणि रावेन ब्लॅक रंगात उपलब्ध
 • 6.4 इंचाचा फुल एचडी सुपर एचडी + Infinit-U सुपर एमोलेड डिस्प्ले (रिसोल्युशन 1080X2340 पिक्सल)
 • 4 कॅमेरे
  1. फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल
  2. फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सल
 • रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर
 • 6000 एमएएचची दमदार बॅटरी
 • 4G, VoLTE, 3G, WiFi, Bluetooth, GPS आणि USB Type C असे कनेक्टिविटी ऑप्शन
आपली प्रतिक्रिया द्या