Samsung Galaxy M30s व M10s लॉन्च, वाचा किंमत आणि वैशिष्ट्य

2503

सॅमसंगने हिंदुस्थानात Galaxy M30s आणि Galaxy M10s स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. M30s हा स्मार्टफोन M30 चे अपग्रेड व्हर्जन आहे. कमी पैशामध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी हे दोन्ही फोन आवाक्यात आहेत. याची बॅटरीही दमदार असल्याने ग्राहकांना हे स्मार्टफोन नक्की आवडतील. तसेच 10 हजाराच्या आत AMOLED डिस्प्ले असणारा Galaxy M10s हा पहिला स्मार्टफोन असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

Galaxy M30s ची वैशिष्ट्य –

 • AMOLED पॅनलसह 6.4 इंचाचा डिस्प्ले
 • 6000 एमएएचची बॅटरी
 • ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगर कॅमेरा आणि 5 एमपी डेप्थ कॅमेरा)
 • 4 जीबी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी स्टोरेज

samsung

 • 6 जीबी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये 128 जीबी स्टोरेज (कार्डच्या मदतीसह स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार)
 • ओपल ब्लॅक, सफायर ब्लू आणि पर्ल कलरमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध
 • 4GB/64GB व्हेरिएन्टची किंमत 13,999
 • 6GB/128GB व्हेरिएन्टची किंमत 16,999
 • (29 सप्टेंबरपासून खरेदी करता येणार)

Galaxy M10s ची वैशिष्ट्य –

 • AMOLED पॅनलसह 6.4 इंचाचा डिस्प्ले
 • 4000 एमएएचची बॅटरी
 • 3GB/32GB व्हेरिएंटची किंमत 8,999

आपली प्रतिक्रिया द्या