सॅमी खान ‘नवोदित मुंबई श्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवोदित मुंबई श्री’ ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक बॉडी बिल्डरसाठी त्यांच्या करीअर बांधणीचा जणू पायाच. आज या स्पर्धेत परब फिटनेसच्या सॅमी खानने बाजी मारत सर्वांनाच धक्का दिला.
सात वजनी गटात आयोजित या स्पर्धेमध्ये 183 शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा प्रत्येक गट आव्हानात्मक होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या 55 किलो वजनी गटात पॉवर फिटनेसचा अक्षय गव्हाणे, 60 किलो वजनी गटात धर्मवीर जिमचा शुभम अधगिले सरस ठरला. 65 किलोत ग्रो मसल जिमचा अनिल जैस्वाल अव्वल आला, तर 70 किलो वजनी गटात परब फिटनेसच्या सॅमी खानने बाजी मारली. पुढच्या तिन्ही गटांत गटविजेतेपदासाठी काँटे की टक्कर झाली. ज्यात नीलेश सोनी, प्रणव खातू, सुलतान पठाण पहिले आले. ‘नवोदित मुंबई श्री’चा किताब जिंकण्यासाठी झालेल्या लढतीत टॉपचे चार गट जबरदस्त होते. पण सॅमी खानने या सर्वांवर मात करत निर्विवादपणे विजेतेपद पटकावले.

‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा निकाल

n 55 किलो ः 1)अक्षय गवाणे (पॉवर फिटनेस), 2) मयूरेश नाईक (जिम प्लॅनेट), 3) कादिर शेख (सोशल डी. फिटनेस), n 60 किलो ः 1) शुभम अढगिळे ( धर्मवीर व्यायामशाळा), 2) अनिकेत नाईक – जे. डी. फिटनेस, 3) आदित्य जावळे (के. फिटनेस),
n 65 किलो ः 1) अनिल जैस्वाल (ग्रो मसल जिम), 2) प्रतीक साळवी – मा. (साहेब जिम), 3) निखिल आंबोरे (परब फिटनेस), n 70 किलो ः 1) सॅमी खान (परब फिटनेस), 2). सूरज निमैल (परब फिटनेस), 3) मोहित चव्हाण (बी स्ट्राँग), n 75 किलो ः 1) नीलेश सोनी (रिफेल फिटनेस), 2). रोहन ठाकूर (परब फिटनेस) , 3) सिद्धेश कुरपे (यंग दत्ताराम) n 80 किलो ः 1) प्रणव खातू (यंग दत्ताराम), 2)गणेश नगरकर (सर्वेश्वर जिम), 3) जमाल समद (परब फिटनेस),
n 80 किलोवरील ः 1) सुलतान पठाण ( द. फ्लेक्स), 2) विकास कदम (जे. डी. फिटनेस), 3)ओमकार सुर्वे (आदियांश जिम)
n ‘नवोदित मुंबई श्री’ ः सॅमी खान (परब फिटनेस)