संजीव पुनाळेकर यांची अटक निषेधार्ह; सनातन संस्थेने केला विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव, अधिवक्ता अॅड. संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे, असे मत सनातन संस्थेने व्यक्त केले आहे. पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला आहे.

सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे, असेही ते म्हणाले. मालेगाव स्फोटप्रकरणी भगव्या आतंकवादाचा खोटेपणा पुनाळेकर यांनी सिद्ध केला. समाजाच्या हितासाठी अनेक याचिका करणाऱ्या पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे, असे सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.