वाळू उपसा करणारी सहा वाहने ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्णा तालुक्यात अवैधरित्या नदी पात्रातुन वाळू उपसा करणार्‍या वाहनांवर महसूलच्या विभागाने मंगळवार 28 एप्रिल रोजी कारवाई केली आहे. यामध्ये सहा वाहने, दोन ट्रॉल्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाहनांना 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती तहसिलदार वंदना मस्के यांनी दिली.

तालुक्यातील सुकी, ममदापुर शिवारात महसूलच्या पथकाने कारवाई केली. तालुक्यातील गोदावरी, पूर्णा नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. ही बाब  प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, मुरलीधर मोरे आणि स्थानिक तलाठी यांनी कानडखेड शिवारात एम. 26- के.9893, धनगर टाकळी शिवारातुन एम.एच. 40 – बी.एल. 6865 ही वाहने ताब्यात घेतली. तर तहसिलदार वंदना मस्के, उपेंद्र करवंदे, अभिजीत पाटील, श्रीमती बळवंते, नंदु शेलाटे, शिवप्रसाद देवणे, मकरंद, मुरली मोरे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री सुकी, ममदापुर शिवारात कारवाई करत एम.एच. 26 – के. 7574, एम.एच. 22 – एच. 6576 आणि इतर दोन असे चार ट्रॅक्टर, दोन ट्रॉली जप्त केली. ही वाहने पूर्णा तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. सदर वाहनांना उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांनी सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महसूलच्या कारवाईनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.