आर्मीस्पोट्स इन्स्टिट्यूटच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंढव्यातील आर्मीस्पोट्स इन्स्टिट्यूटमधील अधिकारी वास्तव्य करीत असलेल्या बंगाल्याच्या आवारातून चोरट्यांनी 4 चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजी बर्गे (वय 56) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील आर्मीस्पोट्स इन्स्टिट्यूट असून बंगला क्रमांक चारमध्ये अधिकारी राहुल पाटील राहायला आहेत. त्याठिकाणी तक्रारदार बर्गे हे सिक्युरिटी ऑफिसर आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पाटील यांच्या बंगाल्याच्या आवारातून 4 चंदनाची झाडे चोरुन नेली. त्यानंतर बर्गे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. या प्रकरणी मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.