सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन, 136 जणांकडून 24 हजार वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. शहरातील प्रमुख मार्गांवर जादा पोलिसांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यानुसार दिवसभरात विनामास्क फिरणाऱयांबरोबरच कर्णकर्कश हॉर्न बसविलेले वाहनधारक, ट्रिपल सीट चालकांवरही कारवाई करण्यात आली. यांत 136 जणांवर कारवाई करीत 24 हजारांचा दंड वसूल केला.

बाजारपेठेसह रस्त्यावर वाढलेल्या रहदारीमुळे विनामास्क फिरणारे, ट्रिपल सीट, परवाना न बाळगता फिरणाऱयांवर कडक कारवाईचा आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला आहे. त्यानुसार वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी कारवाई सुरू केली आहे.