संगमेश्वर – उमरे धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह 16 तासांनी सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर जवळच्या उमरे येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या आणि बुडून मृत्यू झालेल्या संदेश धोंडीराम मोहिते याचा मृतदेह 16 तासानंतर धरणाच्या बाजूच्या डोहामध्ये सापडला आहे.

सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील उमरे बौद्धवाडी तिघेजण आंघोळी उमरे संतोष आग्रे, (49 )सागर मोहिते (28)आणि संदेश धोंडीराम मोहिते वय अंदाजे 36 हे तीघे नेहमीप्रमाणे दुपारी उमरे धरणात आंघोळी करता उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने संदेश धोंडीराम मोहिते हा इसम डोहांत बुडाला होता तर दोघांना वाचवण्यात यश आले होते.

धरणांमध्ये बुडालेल्या संदेश मोहितेचा शोध संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, कामेरकर याने ग्रामस्थांच्या मदतीने घेण्याचा प्रयत्न केला परंतु संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला नव्हता. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबली होती. मात्र मंगळवारी सकाळच्या दरम्याने पोलीस कामेरकर, कांबळे आणि उपनिरीक्षक देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पुन्हा सुरू झाली. ग्रामस्थांच्या मदतीने देण्यात आलेल्या मोहिमेमध्ये यश येऊन संदेश याचा मृतदेह धरणाजवळच्या डोहामध्ये आढळून आला आहे .