
संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावातील गोविंद कांबळे यांच्यावर जानेवारी 2017 मधे बिबट्याने घरात घुसून हल्ला केला होता. यात जबर जखमी झालेले कांबळे मरता मरता वाचले. त्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणाही झाली मात्र गेली तीन वर्षे हि प्रक्रियाच अपुरी राहिली.
गोविंद कांबळे यांचा प्रस्ताव काहि कागदपत्र नसल्याने अपुरा होता. यासाठी आमदार निकम यांनी थेट वनमंत्र्याना साकडे घातले. त्यानंतर सर्व सुत्र झटपट हलली आणि परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यावर आज सकाळी देवरुख येथे आमदार निकम यांच्या हस्ते 1 लाख रुपयांचा धनादेश कांबळे यांना सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला सुरेश बने हनिफ हरचिकर, बाळू ढवळे पंकज पुसळकर , प्रफुल्ल भुवड, निलेश भुवड, नितीन भोसले, नितीन पाटोळे, मंगेश बंडागले, अमित जाधव, रामू पंदरे, विनोद वाडकर, जितू नलावडे, बाबा मिया जेटी, इम्रान जेटी, परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती प्रियांका लगड, वनपाल संगमेश्वर (देवरुख) सुरेश उपरे, वनरक्षक साखरपा न्हानू गावडे, वनरक्षक दाभोळे मिलिंद डाफळे ,वनरक्षक आरवली आकाश कडूकर, वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा सूरज तेली , राहुल गुंटे, वनरक्षक फुणगुस श्रीमती शर्वरी कदम आदी उपस्थित होते.
























































