
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. एकीकडे एकीकडे बर्ड फ्ल्यूमुळे कोंबडय़ांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून चिकन खाणं सोडून दिले आहे. अशातच आता कोंबडी स्वत: मला कापू नका असं म्हणत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून कुणीही हसल्याशिवाय राहणार नाही. अल्पावधीतच हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
एका चिकन शॉपमध्ये हातात सूरी घेऊन ‘तुझे काटू क्या’? असे म्हणत असलेला दुकानदार आणि मुंडी खाली नेऊन बसलेली आणि मुंडी हलवत ‘नको, नको, नको’ म्हणणाऱ्या कोंबडीचा हा व्हिडियो आहे. मोठ्या हुशारीने कोंबडी स्वत:ला कापण्यास नकार देत आहे. सांगलीत सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच शेअर होत आहे. अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ फिरतोय. पण नेमका हा कोणत्या भागातील दुकांनातील व्हिडीओ आहे हे कळू शकले नाही.



























































