सांगली- कोरोनाच्या धास्तीने वृद्धाची आत्महत्या

570
suicide

कोरोनाच्या धास्तीने सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील एका वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काही काळात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोनाच्या धास्तीने आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दिंगबर खांडेकर या 68 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या वृद्धाच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्याची भीती मनात धरून या वृद्धाने आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा पहाटे मृत्यू झाला. या महिलेला थायरॉइड, मधुमेह आणि हृदय विकार होता. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. सांगली जिल्ह्यात काल एका दिवशी 15 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 143 वर पोहोचली आहे. त्यातील सात रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या