
आंब्याच्या एकाच झाडाला देशी-विदेशी प्रकारचे आंबे मिळाले तर… अशक्यप्राय वाटणारी ही कल्पना सांगलीच्या जत तालुक्यातील एका शेतकऱयाने प्रत्यक्षात उतरवली आहे. काकासाहेब सावंत असे या प्रयोगशील शेतकऱयाचे नाव आहे. त्यांनी शेतीत केलेल्या या भन्नाट प्रयोगाची सध्या सर्कत्र चर्चा होत आहे.
काही वर्षांपूर्वी पुण्यात एका ऑटोमोबाईल कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करणाऱया काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून स्कतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतले. जतसारख्या दुष्काळी भागात त्यांनी फळबाग आणि नर्सरी सुरू केली. नोकरी करताना काही हजार रुपयांची कमाई करणारे काकासाहेब आता वर्षाकाठी तब्बल 50 लाख रुपयांची उलाढाल करतायत. त्यांची नर्सरी आज चांगलीच नाकारूपाला आली आहे. वर्षाकाठी ते दोन लाख आंब्यांची रोपे विकतात. सीताफळ, चिकू, जांभूळ आदी फळांच्या रोपांसाठीही राज्यभरातून ऑर्डर मिळतायत.
गावकऱयांनी उडकली टिंगल
काकासाहेब सावंत यांनी दहा एकर जागेत आंब्याची लागवड केली आहे. आंब्याची लागवड प्रामुख्याने कोकणात केली जाते. सांगलीत हा प्रयोग यशस्वी होणार नाही असे म्हणत सुरुवातीच्या काळाच गावकऱयांनी त्यांची चेष्टा केली. परंतु इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर सांगलीत आंब्याची यशस्कीरित्या लागवड करून दाखवली.
असा केला प्रयोग…
एकाच झाडावर तब्बल 22 जातींचे आंबे घेण्याची किमया त्यांनी साधली आहे. या प्रयोगाबाबत ते म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वी मी हे रोपटे लावले होते. साधारण तीन फुटांचा खड्डा खोदून त्यात देशी आंब्याची कोय लावली. खत टाकून तो खड्डा बुजवला. त्यानंतर वर्षभराने रोपटय़ाची व्यवस्थित वाढ झाल्यानंतर त्याच्या प्रत्येक फांदीला वेगवेगळे कलम जोडले.’’
झाडाला त्यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलमे केली. त्यातील 22 जातीची कलमे यशस्की झाली आहेत. यात केसर, हापूस, सिंधू, रत्ना, लालबाग, तैवान, दशेरी, राजापुरी, बेनिश, आम्रपाली, क्रोटोन, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, तोतापुरी अशा देशी-विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत.




























































