विक्की वेलिंगकर’मध्ये संग्राम

269

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी. निशाणदार निर्मित व प्रणय चोक्सी आणिडान्सिंग शिवाप्रस्तुत तसेच सौरभ वर्मा दिग्दर्शित बहुप्रतिक्षितविक्की वेलिंगकरया चित्रपटात अभिनेता संग्राम समेळ एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे

काही दिवसांपूर्की संग्रामने त्याचे फोटो पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. संग्राम समेळ पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीसोबत पडद्यावर दिसेल. ‘विक्की वेलिंगकर’ 6 डिसेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.‘विक्की वेलिंगकरही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो घडय़ाळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते तिची ही कथा आहे. त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. संग्राम यामध्ये विक्कीच्या मित्राची भूमिका साकारत आहे आणि तो एक हॅकर आहे. त्याची भूमिका ही मैत्रीसाठी जीवाला जीव लावणार असे हे पात्र आहे. मला संग्रामबरोबर काम करताना खूप मज्जा आली, असे सोनाली कुलकर्णी सांगते. तसेच यांच्याबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पकार, गौरक मोरे, आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या