सॅनिटायझर निविदेच्या नावाखाली लावला चुना

458

सॅनिटायझर निविदेच्या नावाखाली व्यावसायिकाला चुना लावल्याची घटना घडली आहे. फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे बोरिवली परिसरात राहतात. ते विविध रुग्णालयांना फार्मा प्रॉडक्ट पुरवण्याचे काम करतात. जून महिन्यात त्याना मोबाईल वर फोन आला. पुण्यातील एका रुग्णालयात सॅनिटायझर पुरवठय़ासाठी निविदा काढली जात असल्याचे तक्रारदाराना सांगितले. निविदा भरण्यास सांगून तक्रारदाराना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱया दिवशी तक्रारदाराना पुन्हा फोन आला. आणखी एक निविदा देतो असे सांगून 31 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर दोन दिवसानी तक्रारदाराना पुन्हा फोन आला. आणखी 25 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. निविदा काढल्यावर लवकरच पैसे जमा करतो असे भासवण्यात आले.

हा प्रकार तक्रारदाराना संशयास्पद वाटला. त्यानी पुण्यातील एका रुग्णालयात फोन करून विचारणा केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. 92 हजाराची फसवणूव प्रकरणी तक्रारदारानी बोरिवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला.

आपली प्रतिक्रिया द्या