माजी मंत्री संजय देवतळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग चारदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी आणि मंत्रिपद भोगलेल्या संजय देवतळे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. देवतळे यांनी भगवा खांद्यावर घेतला. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

संजय देवतळे हे काँग्रेसचा मात्री मंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने तिकीट नाकारल्यने ऐनवेळेस त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विधानसभा लढली. आता 2019 ला शिवसेना-भाजप युती झाल्याने वरोरा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आहे. त्यामुळे देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.