अभिनेता संजय दत्तला डिस्चार्ज!

333

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सोमवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी सायंकाळी त्याला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने संजय दत्तच्या छातीमध्ये दुखू लागले होते. लीलावतीमध्ये त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याच्याकर नॉन कोव्हिड कॉर्डमध्ये उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने दोनच दिवसात त्याला डिस्चार्ज दिला आहे. संजय दत्तची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले लॉकडाऊन दरम्यान दुबईत अडवले आहेत. आपल्या कुटुंबीयांना मिस करत असल्याचे लॉकडाऊनदरम्यान त्याने सोशल मीडियावरून अनेकदा
सांगितले होते. लवकरच तो ‘सडक 2’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या