
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त देखील बहिण प्रिया दत्तच्या पाऊलावर पाऊल ठेवत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजते.
आज तक या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त लोकसभा निवडणूक लढू शकतो. संजयला तिकीट देण्यासाठी मायावतीचा बसपा व अखिलेश यादवचा सपा हे दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. मात्र संजय दत्तची कर्मभूमी जरी मुंबई असली तरी तो निवडणूक गाजियाबादमधून लढवू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे


























































