लॉकडाऊनमुळे संजूबाबाला आठवले तुरुंगातले दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. परंतु लॉकडाऊनचे हे दिवस माझ्यासाठी तुरुंगातील दिवसांप्रमाणेच असून आपण कुटुंबियांना खूप मिस करत असल्याचे अभिनेता संजय दत्त याने सांगितले आहे.

संजय दत्तची पत्नी मान्यता आणि दोन मुले लॉकडाऊनमुळे सध्या दुबईत अडकले आहेत. संजय दत्त मात्र मुंबईत असून व्हर्च्युअली तो कुटुंबीयांशी कनेक्ट आहे. तो म्हणाला, तुरुंगातील दिवस आणि लॉकडाऊनचे दिवस माझ्यासाठी सारखेच आहेत. त्यावेळी मी कुटुंबियांना मिस करत होतो तसेच आता देखील मिस करीत आहे. फरक इतकाच की तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी त्यांना हवे तेव्हा बघू शकतो. ऐकू शकतो. लॉकडाऊन संपताच मी सर्वात आधी कुटुंबीयांची भेट घेणार आहे असेही त्याने सांगितले. दरम्यान अभिनय करणे हे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा आव्हानात्मक आहे. या काळात मी मन शांत ठेऊन माझी बॅटरी चार्ज करतोय. जेणेकरून आगामी काळात अधिक चांगल्या प्रकारे भूमिकांची तयारी करू शकेन, असेही संजूबाबा पुढे म्हणाला.