रंगभूमी – ऑर्केस्ट्राचे सप्तसूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

मराठी, हिंदी प्रेक्षक हे चित्रपट गाण्यांचे शौकीन. अशा सदाबहार गाण्यांनी नटलेल्या ऑर्केस्ट्रांनी एक काळ प्रचंड गाजवला. अशाच लोकप्रिय ऑर्केस्ट्राच्या सप्तसुरांची ही आठवण.

पन्नास वर्षांपूर्वी मराठी, हिंदी प्रेक्षक हे चित्रपट गाण्यांचे  शौकीन. मुंबईत त्या वेळी इराण्यांची हॉटेल्स होती. त्या प्रत्येक

हॉटेलात ज्यूक बॉक्स असायचा. आपली आवडती गाणी त्यावर लावून बन मस्का खात, पानी-कम-चहा पीत ती गाणी ऐकायची. आपले गाणे प्रथम लावण्यासाठी इराण्याच्या काऊंटरवर मस्का पॉलिशसुद्धा काहीजण करीत असत. मनसोक्त गाण्यांचा आनंद लुटण्यासाठी इराणी

हॉटेलमध्ये महाविद्यालयातील तरुण मंडळी,  नोकरी करणारे येत असत असे चित्र त्या काळच्या मंडळींनी पाहिलेले असेल आणि अनुभवलेसुद्धा असेल. त्याच सुमारास

ऑर्केस्ट्राचे प्रयोग नाटय़गृहात सादर होत असत. त्यालासुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद जोरकस असायचा. पुण्याचा ‘मेलडी मेकर्स’ हा ऑर्केस्ट्रा मुंबईत आला की, त्याचा प्रत्येक शो हाऊसफुल्ल होत असे. षण्मुखानंद सभागृहात त्या काळी त्याचे प्रयोग हाऊसफुल्ल होत यावरून ऑर्केस्ट्राची काय ाsढझ होती ते लक्षात येईल. सुदेश भोसले हा त्या ऑर्केस्ट्रात मिपी करणारा कलाकार. हिंदी गायकांच्या आवाजातील गाणी त्यांच्याकडून ऐकताना त्याचे कौतुक प्रेक्षक करायचे. त्याला लोकप्रियता ‘मेलडी मेकर्स’

ऑर्केस्ट्रातूनच मिळाली. आज सुदेश भोसले सेलिब्रेटी बनले आहेत. प्रत्येक वाहिनीवरच्या सांगितिक कार्पामात त्यांना आमंत्रित केले जाते. वाहिनीच्या पुरस्कार सोहळय़ात त्यांना दोन ते तीन गाणी गावीच लागतात. हा त्यांचा गायक म्हणून सन्मान आहे. एक जमाना ‘मेलडी मेकर्स’

ऑर्केस्ट्राचा होता हे जसे ऑर्केस्ट्रावाले विसरू शकत नाहीत तसेच आमचे नाटकवालेसुद्धा. या ऑर्केस्ट्राने ऑर्केस्ट्राला व्यावसायिकपणाचा एक आदर्श घालून दिला हे कोणीही नाकारू शकत नाही.

मग त्याचे अनुकरण काही मंडळींनी केले. काहींना यश आले तर काहींच्या पदरी निराशा पडली. तरीही

ऑर्केस्ट्राची ाsढझ कमी झाली नाही. ‘महेश कुमार आणि पार्टी’ हा दुसरा ऑर्केस्ट्रा मुंबईत धुमाकूळ घालताना दिसला. महेश कुमार आणि नरेश कुमार या कनोदियाबंधू जोडीने नाही म्हणता 15 हजारांहून अधिक शो केले. महेश कुमार तर लता-आशा यांचीसुद्धा गाणी गायचा. त्यालासुद्धा अमाप लोकप्रियता लाभली. प्रयोग संपल्यावर घरी जाताना मिळालेल्या पैशांतील काही रक्कम ती दोघे भिकाऱयांना वाटत असत. दौऱयावर असले की त्यांच्या हॉटेलच्या बाहेर भिकाऱयांची गर्दी  जमायची. ते भाऊ आगळेवेगळे  होते.

कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीने संगीत दिलेली गाणी आणि चित्रपट हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय होती. त्यांचा भाऊ बाबला यांचासुद्धा

ऑर्केस्ट्रा होता. ड्रम वाजविण्यात त्यांची मास्टरी होती. त्यांनी डिस्को गाणी तरुण मंडळीत लोकप्रिय करताना आपल्या भोवती एक वलय निर्माण केले. दांडिया रास किंवा डिस्को दांडिया हा त्यांच्या

ऑर्केस्ट्राने सुरू केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

या दादा मंडळीत एक मराठी गायिका आपल्या आवाजाने आणि श्रवणीय वाद्यवृंदामुळे प्रेक्षकांना आकर्षित करताना दिसली. ती गायिका प्रमिला दातार आणि त्यांचा ऑर्केस्ट्रा ‘सुनहरी यादे!’ त्यांच्या या ऑर्केस्ट्राची मुहूर्तमेढ 14 एप्रिल 1975 ला रोवली होती. तो दिवस गुढीपाडव्याचा होता. तो प्रयोग रसिकांच्या स्मरणात अजूनही आहे. योगायोग हा की, यंदाच्या गुढीपाडव्यास त्यांनी मोठय़ा दिमाख्यात चार हजारावा प्रयोग वयाच्या 82 व्या वर्षी सादर करून रसिकांची दाद तर मिळवलीच, पण त्याहीपेक्षा त्यांचे कौतुकसुद्धा केले. ‘सुनहरी यादे’ हा

ऑर्केस्ट्रा एक स्त्राr दिमाखात आणि व्यवसायात हिट करून दाखवते हा त्या वेळी कुतूहलाचा विषय होता. कारण त्या काळी

ऑर्केस्ट्रात पुरुषांची मक्तेदारी होती. ती त्यांनी मोडली. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी करताना त्यांच्याकडे आठवणीचा खजिना आहे. त्यावर कधीतरी लिहीनच.

‘झपाटा’ हा अजून एक ऑर्केस्ट्रा! वसंत खेर, श्रीकांत कुलकर्णी आणि कृष्णकुमार गावंड या त्रिकूटाने त्याची निर्मिती केली होती. त्या ऑर्केस्ट्राची खासियत ही त्यांच्या जाहिरातीची होती. त्यांच्या प्रयोगाच्या जाहिराती गाजल्या. प्रयोग करता करता व्यावसायिक नाटकांच्या जाहिराती त्यांच्याकडे येऊ लागल्या.

सांगली-मिरज येथील सप्तकने निर्मिती केलेला ‘भुले बिसरे गीत’ हा ऑर्केस्ट्रा मुंबईत लोकप्रिय झाला तो त्यांनी सादर केलेल्या जुन्या गाण्यांमुळेच. 100  वा प्रयोग बाळासाहेबांच्या उपस्थितीत दीनानाथ नाटय़गृहात सादर झाला. बाळासाहेब आणि श्रीकांतजी यांचे  त्या गाण्यांबद्दलचे कौतुक आजही आठवते. कालांतराने हे सगळे ऑर्केस्ट्रा बंद झाले. त्यानंतर प्रसाद महाडकरांचा ‘जीवनगाणी’ हा ऑर्केस्ट्रा मोठय़ा दिमाखात व्यावसायिक रंगभूमीवर रुजू झाला. त्याला यश मिळाले. प्रसाद महाडकर त्यांच्या व्यावसायिक कौशल्याने त्याचे प्रयोग करताना दिसताहेत. म्हणूनच त्या  प्रयोगांना रसिकांचा प्रतिसाद मिळतोय. एक मात्र इथे नमूद करावेसे वाटते की, या

ऑर्केस्ट्रा मंडळींचे त्या वेळी होते आणि आजही ते दुःख आहे, की त्यांना कुणीही वाली नाही. त्याबद्दल सविस्तर लिहिणारच आहे.

एवढे मात्र म्हणावेसे वाटते की, ऑर्केस्ट्राचे सप्तसूर कधीच विरून गेले आहेत.