आप जिस स्कूल में पढते हैं, उसके हम हेडमास्टर हैं, संजय राऊत यांचे केंद्र सरकारला खडे बोल

1363

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आणि समर्थन करणारे देशभक्त अशी व्याख्या सरकारी पक्षाकडून केली जात आहे. आम्हाला कोणी देशभक्ती शिकवू नये आणि त्याचे प्रमाणपत्रही देऊ नये, असा घणाघात शिवसेनेचे संसदीय पक्ष नेते, खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत केला. आम्ही किती कट्टर हिंदू आहोत याचेही प्रमाणपत्र कोणी आम्हाला द्यायची गरज नाही. ‘आप जिस स्कूल में पढते हैं, उस स्कूल के हम हेडमास्टर हैं।’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते. अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जीही आमचे हेडमास्तर होते, असे खडेबोल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सुनावले.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील राज्यसभेत चर्चेवेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुटप्पी भूमिकेची चिरफाड केली. देशात देशभक्त आणि देशद्रोही अशी विभागणी केली जात आहे. सभागृहातील सगळेच सदस्य देशातील जनतेनेच निवडून दिले आहेत. देशातील जनतेनेच सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांना इथे पाठवले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगित

व्होट बँकेचे राजकारण करू नका; 25 वर्षे मतदानाचा अधिकार देऊ नये!
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे हनन झाले आहे. मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, हे दुर्दैवी आहे. हा लाखों, कोटय़वधी लोकांच्या वेदनेचा विषय आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून या शरणार्थींना अन्न, वस्त्र्ा, निवारा जरूर द्यावा; पण यावर व्होट बँकेचे राजकारण करू नका. 25 वर्षे या शरणार्थींना मतदानाचा अधिकारी देऊ नका. सरकार हे पाऊल उचलणार का? व्होट बँकेचे राजकारण बंद करणार का? असे खडे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

n देशातील प्रत्येक घुसखोराला हाकलून लावू, असे आश्वासन गृह मंत्र्यांनीच सभांमधून दिले होते. अगोदर घुसखोरांना हाकला, असे संजय राऊत यांनी सरकारला सुनावले. कलम-370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरात पुनर्वसन होईल, अशी आशा कश्मिरी पंडितांना होती याकडे लक्ष वेधत राऊत म्हणाले, कश्मिरी पंडितांचे आधी पुनर्वसन करा.

आपली प्रतिक्रिया द्या