Video – पद व पैशासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचेही राजकारण करणारे मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गर्भित इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्युनंतर जी विटंबना हे लोक करत आहेत, त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिला.