महाराष्ट्र आज आनंदी आहे! उद्धव ठाकरे- राज ठाकरे भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया

शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

पहिल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करत त्यासोबत ‘महाराष्ट्र आज आनंदी आहे!’, अशी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच त्यानंतर त्यांनी शिवसेना व मनसे नेत्यांचा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासोबतचा एकत्रित फोटो शेअर करत ”सगळे एकत्र! काहीच अडचण नाही!” अशी पोस्ट शेअर केली आहे.