
हिंदुस्थानला सर्वाधिक धोका दिल्लीतील सरकारपासून आहे. सरकारची कोणतीही भूमिका नाही. हे सरकार 24 तास आणि 365 दिवस इलेक्शन मोडमध्ये असते. जगात आणि देशात एवढी मोठी समस्या निर्माण झालेली असतानाही मोदी निवडणुकीत व्यस्त असून त्यांचे राजकारणातील अखेरचे दिवस सुरू झाले आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. सोमवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
पेट्रोल, गॅसबाबत भ्रम पसरवणाऱ्यांपासून देशाला धोका असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारावेळी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हिंदुस्थानला सर्वाधिक धोका दिल्लीतील सरकारपासून आहे. या सरकारची कोणतीही भूमिका नाही. सरकारला कोणतीही काही दिशा नाही. हे सरकार 24 तास आणि 365 दिवस इलेक्शन मोडमध्ये असते.
जगात आणि देशात एवढी मोठी समस्या निर्माण झाली असूनही मोदी दिल्लीत नाही. पाकिस्तान एक भूमिका घेऊन युद्धबंदीसाठी काम करत आहे. हिंदुस्थानची भूमिका काय? मोदी केरळच्या निवडणुकीत असून मग पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरीला जाणार. पंतप्रधान मोदींचे राजकारणातील अखेरचे दिवस सुरू झाले आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला होता. याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असून जवळपास गेल्या 10 वर्षांपासून आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. घुसखोर असतील तरी तुमची जबाबदारी असून बीएएसएफ, लष्कर, यंत्रणा तुमच्याकडे आहे. हे तुमचे अपयश असून तुम्ही राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
आमचे खासदार फुटणार नाहीत, शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना दिसेल! – संजय राऊत
हिंदुस्थानच्या जनतेने अमेरिकेकडून काहीतरी शिकायला हवं!
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोष उफाळला असून अमेरिकेत आंदोलन सुरू झाली आहेत. ट्रम्पविरोधात अमेरिकेत 3300 ठिकाणं आंदोलनं झाली. अमेरिकेत लोकशाही जिवंत असल्याचे हे लक्षण आहे. नो किंग्स… मनमानी, हुकुमशाही, राजेशाही चालणार नाही अशा घोषणा ट्रम्पच्या विरोधात देण्यात आल्या. प्रे. ट्रम्प हे इराणचे शासन बदण्यास निघाले होते. पण त्यांच्या देशात 80 लाख लोक रस्त्यावर उतरले. हिंदुस्थानच्या जनतेने यापासून काही शिकायला पाहिजे, असे मोदी म्हणाले.






























































