सोयीच्या प्रभाग रचनांसाठी मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात; संजय राऊत यांचा हल्लाबोल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध महानगरपालिकांच्या प्रभाग रचना जाहीर करण्यात येत आहे. भाजप आणि मिंधे गटाच्या दबावाखाली या प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. सोयीच्या प्रभाग रचनांसाठी मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केला.

महापालिका निवडणुकीत आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्या यासाठ मिंधे गट, भाजप कोणत्याही थराला जावू शकतात. जोपर्यंत मोदी, शहांसारखे लोक सत्तेत आहेत तोपर्यंत या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात होणार नाहीत. मग महापालिका निवडणुका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो. कारण पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर. निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

29 प्रभाग, 115 सदस्य; वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर

फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना फोन

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही भाष्य केले. आम्ही सगळ्यांनी मिळून संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. निवडणुकीच्या प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत. उद्धव ठाकरे यांनी आमच्या सगळ्यांशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आल्याची माहिती दिली, असेही राऊत यांनी सांगितले.

पाणी, व्यवहार बंद केले, मग पाकिस्तानशी क्रिकेट कशासाठी? भाजप समर्थक सट्टेबाजांसाठी? संजय राऊत कडाडले

राजभवनात मुख्यमंत्र्यांना अटक

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्याबाबत एक किस्सा सांगितला. झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजभवनात आलेले असताना त्यांना अटक करण्यात आली. हेच मी सुद्धा सांगितले आहे, असे संजय राऊत म्हणाले. हेमंत सोरेन नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजभवनला राजीनामा द्यायला गेले आणि जे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत त्यांच्यापुढे ईडीने त्यांना अटक केली. हे अत्यंत्य अमानुष कृत्य होते आणि हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार खुर्चीवर हसत बसले होते, असे राऊत यांनी सांगितले.