
निवडणूक आयोग व तृणमूल काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये आज दिल्लीत एक बैठक पार पडली. ही बैठक अवघ्या 7 मिनिटात आटोपली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एक ट्विट करत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग भय आणि हिंसा रहित होतील तसा स्पष्ट संदेश तृणमूल काँग्रेसला दिल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या ट्विटवर देशभरातून टीका होत असून विरोधकांनी देखील आयोगाला फैलावर घेतले आहे.
देश के गद्दारोंको
जुते मारो सालोंको
(चुनाव आयोग को श्रद्धांजली) https://t.co/bcpyPhZvJm— Sanjay Raut (@rautsanjay61) April 8, 2026
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी यावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचे ट्विट रिट्विट केले आहे. त्यासोबत ”देशाच्या गद्दारांना चपलेने झोडले पाहिजे. निवडणूक आयोगाला श्रद्धांजली” अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
दिल्ली येथे आज निवडणूक आयोग व तृणमूल काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्याला चालते व्हा, असे म्हटल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केला आहे. तर निवडणूक आयोगाने या बैठकीत तृणमूल काँग्रेसला निवडणूका भय व हिंसा रहित होणार असल्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे म्हटले आहे.

























































