
इराण हा हिंदुस्थानचा जुना मित्र आहे, खामेनी हे पंडित नेहरुंचे भक्त होते, याचा राग मोदींना आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच व्हेनेझुएलाच्या राष्ट्रध्यक्षाप्रमाणे आपल्यलाही उचलून नेतील या भितीने मोदींनी खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त नाही केला का? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा हा तीन तिघाडा आहे. पण काम बिघाडा नाही. काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आहे. तीन पक्ष एकमेकांशी बोलतायत, ती बोलणी संपत नाहीत. त्याच्यामुळे म्हटले तीन तिघाड आहे. जसं तिकडे महायुतीमध्ये सुद्धा तीन चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एकाच जागेवरून तीन पक्षात सातत्याने चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत सुरूच राहील. काँग्रेस पक्षामध्ये कोण इच्छुक आहे मला माहित नाही. त्यांचे रिटायर होतात रजनीताई पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त शरद पवार आहे तिथे दुसरं कोण इच्छुक असणार. आमच्या पक्षामध्ये प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. इतर काही दोन लोकांनी इच्छा व्यक्त केलेली उद्धवजींना भेटून तर मला वाटत राजन विचारे आहेत विनायक राऊतांच नाव मी ऐकलंय. पण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही, पण निर्णय पक्ष घेत असतो पक्षप्रमुख घेत असतात आणि आता शेवटी अर्ज भरण्याची जहा तारीख तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार. सध्या आपण इंटरनेटच्या युगात आहोत झूमवर बोलणे सुरू असतात. काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली. प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेल राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं शिवसेनेला जास्त वाटतं याच कारण शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे. आणि किमान आमचे दोन प्रतिनिधी हे असावे राज्यसभेत ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे. सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा सुरू आहे. तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी एकमेका चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असायलाच पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलतायत उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलतायत जो निर्णय होईल तो एक मतानेच होईल.
शरद पवार कधी एनडीएसोबत जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचे आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो तर मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगेन.
काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदाची चिंता आहे आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये आपलं संख्याबळ जे दोनच आहे ते टिकवण्याची चिंता आहे. काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवायची चिंता आहे आणि आम्हाला शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये शिवसेनेचा आवाज कायम राहावा ही चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी वेगळी चिंता आहे आणि ती या एका जागेभोवती गुंतलेली आहे. महाविकास आघाडीत संख्याबळानुसार सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे त्याच्यामुळे शिवसेनेची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे.
रोहित पवाराच एकटे हे ही लढाई करता आहेत आणि स्वतः अजित पवारांच्या पत्नी ज्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांची मुलं आहेत त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जी रोहित पवारांची मागणी आहे त्या व्हीएसआर कंपनीवर आणि डीजीसीएवर एफआयआर दाखल व्हायला हवी.
या क्षणी भारतानं सगळ्यात आधी पंतप्रधान मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे. ते लोकांतून निवडून आलेल्या एका राष्ट्राभिमुख सरकारचे सुप्रीम लीडर आहेत. इराण हा हिंदुस्थानचा सगळ्यात जुना परंपरागत मित्र आहे. अत्यंत संकट काळामध्ये इराणने हिंदुस्थानला मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण हिंदुस्थानच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणने हिंदुस्थानला पाठिंबा दिलेला आहे. इराण हा देश असा आहे ज्याने हिंदुस्थानला सगळ्यात स्वस्त तेल दिलेलं आहे. अशा वेळेला हिंदुस्थान सरकारचं कर्तव्य आहे की त्या देशाचा सर्वोच्च नेता ज्याला सुप्रीम लीडर म्हणतात त्यांचं निधन झालं आहे, त्यावर शोक व्यक्त करावा. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरता का? ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी हवी आहे का? व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना जसं अमेरिकेने उचललं तसं तुम्हालाही उचललं जाईल अशी भीती आहे का? शोक व्यक्त करू नका म्हणून तुम्हाला धमकावलं आहे का ? तुम्ही हिंदुस्थानच्या मित्रांच्या मृत्यूत त्यांच्या शोकात सहभागी होत नसाल तर ही चिंतेची बाब आहे असेही संजय राऊत म्हणाले.
Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “I would say that when such a leader is assassinated, India should express mourning and grief. The President of India and the Prime Minister of India should publicly show their condolences. What are you afraid of? Are you… pic.twitter.com/gvPAyQgi1f
— IANS (@ians_india) March 2, 2026
























































