जोरात खोटे बोलल्याने… संजय राऊत यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामपंचायत निवडणूकीत नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला त्यांच्या निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांची यादी जाहीर करण्याचे आव्हान केले आहे. तसेच जोरात बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होतो, असा टोला देखील लगावला आहे.

”एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत असे म्हणणाऱ्या मंडळीनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्राम पंचायत निवडणूका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं ?” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.