भाजपच्या सभेत सपना चौधरीने प्रश्न विचारला मतदान कोणाला करणार? लोकं म्हणाले ‘केजरीवाल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. इथे मुख्य लढत ही सत्ताधारी आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. तीनही पक्षांनी प्रचारात कमालीचा जोर लावला असून भाजपने हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नर्तिका सपना चौधरीला प्रचारात उतरवले आहे. एकीकडे भाजपची नेतेमंडळी घरोघरी जाऊन प्रचार करतायत तर दुसरीकडे सपना चौधरीसारखे कलाकार भाजप उमेदवारांसाठी मते मागत आहेत. ढोंडी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या सपना चौधरीचा कथित व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओ काय आहे ते पाहा