सरस्वतीच्या शिक्षक संघाला उपविजेतेपद

लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा पेंद्राच्या वतीने आयोजित ‘घे भरारी’  क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 अंतर्गत झालेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत कांजूर येथील सरस्वती विद्यालयाच्या शिक्षक क्रिकेट संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष  बाबा कदम आणि शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब पुंदे यांच्या शुभहस्ते शिक्षक क्रिकेट संघाचा गौरव करून सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी संघाच्या कामगिरीचे काwतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत सरस्वती विद्यालयाकडून सहा. शिक्षक किसन मोरे, रामदास हंजनकर, मोतीराम नागम, वैभव ठुबे, आदेश नारकर, अनिल रोकडे, आदिनाथ गर्जे व भाऊसाहेब घाडगे यांनी सहभाग नोंदवून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.