केशरकाकू क्षीरसागरांचा वारसा यांना तेवत ठेवायचा आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्याच्या राजकारणात कायम आदराने नतमस्तक व्हावे वाटते ते नाव म्हणजे स्व. केशरबाई क्षीरसागर होय. एक महिला संसाराचा गाडा चालवत आपल्या कर्तबगारीने जिल्ह्याचा गाडा अत्यंत ताकदीने चालवण्यात यशस्वी झाली हा आदर्श नव्या पिढीला दिशा दर्शक ठरणारा आहे, स्व काकूंच्या राजकारणाचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न त्यांच्या सून ,साहित्यिक, प्राचार्य दिपा क्षीरसागर यांनी केला. आता नव्या पिढीला केशरबाई क्षीरसागर यांचे कर्तुत्त्व आणी नेतृत्व खुणावत आहे. त्यांची नात सून डॉ. सारिका योगेश क्षीरसागर या आता सामाजिक चळवळीतून राजकीय मैदानात उतरल्या आहेत.

उच्च शिक्षित असणाऱ्या सारिका क्षीरसागर या वर्षभरापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून आपले संघटन कौशल्य सिद्ध करत आहेत, गावागावात महिलांना जोडण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, राजकीय कार्यक्रम कोणताही असो काही तरी शिकण्याची काही तरी करून दाखवण्याची त्यांची धडपड सुरू असते. मग सासरे जयदत्त क्षीरसागरांचा कार्यक्रम असो की शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा युवा संवाद असो. महिलांचा मेळावा असो की महिला बचत गटाचा कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रम सारिकाताई यांच्या नियोजनाखाली असतो.