मुख्यमंत्री भाजपचाच! सरोज पांडे यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे महाराष्ट्र भाजप प्रभारी सरोज पांडे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना 50-50 फॉर्म्युलावर आग्रही आहे. मात्र याविषयी कोणतीही बोलणी झालेली नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा याबाबत चर्चा करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने राज्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र आम्हाला अधिक जागांची अपेक्षा होती तरीही महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. लोकांनी दिलेल्या जनमताबद्दल आम्ही आभार मानतो, असे पांडे म्हणाल्या आहेत.

भाजपच्या आमदारांची 30 तारखेला बैठक
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता विधान भवनात आयोजित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. या बैठकीत विधिमंडळाचा नेता निवडला जाईल. दरम्यान, अपक्ष आमदार व छोटय़ा पक्षातील मिळून 15 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.