मालवण तालुका सरपंच-उपसरपंच सेनेची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मालवण तालुका सरपंच-उपसरपंच सेना तालुकाप्रमुखपदी निवड झालेल्या हेदुळ सरपंच नंदू गावडे यांचे अभिनंदन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक सोबत सर्व सरपंच, उपसरपंच. (अमित खोत, मालवण)

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण तालुका सरपंच-उपसरपंच सेनेची स्थापना गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात तालुकाप्रमुखपदी हेदुळ सरपंच नंदू गावडे तर उपतालुकाप्रमुख वायरी भूतनाथ उपसरपंच संदेश तळगावकर यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी किर्लोस सरपंच प्रदीप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच तालुक्याची उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ प्रवीण सावंत यांनी दिली.

मालवण शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या सरपंच व उपरपंच यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर, गणेश कुडाळकर, किरण वाळके, शहर प्रमुख बाबी जोगी, संमेश परब, डॉ प्रवीण सावंत व सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीत सरपंच तसेच काही ठिकाणी उपसरपंच हे शिवसेनेचे आहेत. यापूर्वी केवळ नांदोस ग्रामपंचायत शिवसेनेकडे होती. आता तालुका भगवा होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मालवण तालुक्यातूनच शिवसेनेला सर्वाधिक मताधिक्य असेल. असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.