
सातारा जिह्यातील निसर्गाच्या विविध छटांनी नटलेल्या जावळी खोऱयात ‘जोडी तुझी माझी मॅरेथॉन’ रंगणार आहे. हिंदुस्थानातील पहिली अशी स्पर्धा 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. विहंगम वेण्णा नदीच्या काठावरून हिरव्यागार गवताच्या गालिच्यांमधून वाट काढत जोडीदार धावणार आहेत.
मागील दोन मॅरेथॉनच्या अभुतपूर्व यशानंतर या वेळेस तिसरी मॅरेथॉन काहीतरी खास करण्याच्या दृष्टीने जावळी रनर्स स्पोर्ट्स असोसिएशनने पंबर कसली आहे. आपण आपल्या घरातील कोणत्याही नातलगासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर ही मॅरेथॉन धावता येणार आहे. नवरा-बायको असणाऱया जोडय़ांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.जावळी जोडी मान्सून मॅरेथॉनची ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक ओपन झाली असून लोकांनी या आगळय़ावेगळय़ा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. मागील दोन्ही जोडी मॅरेथॉनमध्ये सर्व जोडय़ांमध्ये 70टक्के नवरा- बायकाsंच्या जोडय़ा होत्या. त्यामुळे या वेळेसही जास्तीत जास्त जोडप्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या जोडीदाराबरोबरचे प्रेमाचे नाते अजून घट्ट करायचे आहे. या जावळी जोडी मान्सून मॅरेथॉनचे अंतर हे 15 किमी, फनरनसाठीचे अंतर 5 किमी आहे.
येथे नाव नोंदणी करता येणार
अधिक माहितीसाठी https://jawalimarathon.com/ ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक https://jawalimarathon.com/RUHA/event/book_tickets/event_main.php?event_id=3 वरील लिंक वर क्लीक करून रेजिस्ट्रेशन करू शकता. ग्रुप बुकिंगसाठी जावळी रनर्स स्पोर्ट्स असोसिएशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





























































