विद्यार्थ्यांना सॅटेलाइट कोडिंगचे धडे 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हाइटहॅट ज्युनियरतर्फे विद्यार्थ्यांना लाइव्ह सॅटेलाइटचा वापर अंतराळ संशोधन आणि अवकाश विज्ञानातील अधिक माहिती देण्यासाठी केला जाणार आहे. अयाना नावाचा उपग्रह एण्डय़ुरोसॅट या आघाडीच्या अंतराळ सेवा संस्थेने व्हाइटहॅट ज्युनियर टीमच्या इनपुट आणि कौशल्याने विकसित केला आहे. अयाना स्पेसएक्स फाल्कन 9 राइडशेअर रॉकेटद्वारे वाहून नेलेल्या पेलोडचा एक भाग होता, जो 25 मे रोजी 18ः35 उश्ऊ वाजता केप कॅनवेरल, फ्लोरिडा, यूएसए येथून प्रक्षेपित करण्यात आला होता. हा अशा प्रकारचा पूर्णपणे नवीन अनुभव असेल. जिथे हजारो विद्यार्थी अंतराळात कार्यरत असलेल्या थेट उपग्रहाला कमांड पाठवू शकतील आणि त्यातून डेटा प्राप्त करू शकतील, असे व्हाइटहॅट ज्युनियरच्या सीईओ अनन्या त्रिपाठी म्हणाल्या. या कार्यक्रमाद्वारे स्पेस कोडर बनण्यासाठी 500 हून अधिक मुलांनी आधीच ‘कोड-ए-सॅटेलाइट’ कार्यक्रमासाठी स्वतःची नोंदणी केली आहे.