
सातगाव वेणा हिंगणा तालुक्यामधील बेघर झालेले 336 कुटुंब गेल्या 18 दिवसांपासून संविधान चौकात आंदोलनाला बसले होते. त्यांना उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी भेट दिली. हे आंदोलन युवा परिवर्तन की आवाज चे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात मागील 18 दिवसांपासून सुरू होते. या आंदोलनाला आज यश प्राप्त झाले आहे. तात्काळ अस्थाई राहण्याकरिता व्यवस्था व स्थायी कोणत्याही शासकीय योजनेमध्ये घर देण्यात यावे. अशा आंदोलनकर्त्यांच्या दोन मुख्य मागण्या होत्या.
याआधी 11 मे रोजी माननीय उप विभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हिंगणा गट विकास अधिकारी यांना सातगाव वेण्या मध्ये बेघर झालेल्या लोकांना घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना किंवा अन्य कोणत्याही शासकीय आवास योजनेत तात्काळ नोंदवून घेण्याकरिता आदेश दिले. त्याचबरोबर आज माननीय उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी या लोकांची अस्थाई व्यवस्था करून देण्याची व्यवस्था करून दिली. हे बघता आज 12 मे रोजी सातगाव मधील बेघर झालेल्या कुटुंबानी हे आंदोलन परत घेण्याची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी म्हटले की, एक महिन्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न करता तुम्ही आंदोलनाला परत बसू शकता असे सातगाव विना या लोकांना संबोधित करताना त्यांनी म्हटले. 18 दिवसाच्या आंदोलनानंतर लोकांना लोकशाही मार्गाने न्याय मिळाला असे प्रतिपादन निहाल पांडे यांनी केले.






























































