‘सौभाग्यवती सरपंच 2’ प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देत प्रेक्षकांची मने जिंकणारी ओरिजिनल वेब सिरीज ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गावाच्या राजकारणातील नवे संघर्ष, सत्तेचा खेळ आणि अवलीची दमदार लढाई ही या सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

पहिल्या भागात एका सामान्य महिलेचा सरपंचपदापर्यंतचा प्रवास आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला होता. त्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसऱ्या भागात गावचे राजकारण, सत्तासंघर्ष, नातेसंबंध, अफवा आणि पाणीटंचाईसारख्या ज्वलंत विषयांना प्रभावीपणे हाताळण्यात आले आहे.

या वेब सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, मिलिंद शिंदे, अश्विनी कुलकर्णी, पद्मनाभ भिंड व इतर कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी ग्रामीण वास्तव, सामाजिक प्रश्न आणि मनोरंजन यांचा सुरेख मिलाफ या कथेतून साकारला आहे.