सौदी अरेबियाचा येमेनवर हवाई हल्ला; 30हून अधिक ठार

499

सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील फौजांनी येमेनमध्ये आज हवाई हल्ला केला. या हकाई हल्ल्यात 30 नागरिक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार प्रमुखांनी हा हल्ला आश्चर्यजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. येमेनमध्ये हुती बंडखोर आणि सौदीच्या नेतृत्वातील इतर देशांच्या लष्करांमध्ये चकमक सुरू आहे. या हवाई हल्ल्याच्या काही तास आधी बंडखोरांनी जाफ प्रांतात एक लष्करी किमान पाडले होते. सौदी अरेबिया सरकारच्या कृत्तसंस्थेने लष्कराचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल-मलिकी यांच्या हकाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टोर्नेडो लष्करी विमान बंडखोरांनी पाडल्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू आहे. हुती बंडखोरांनी पाडलेल्या विमानातून सौदीच्या नेतृत्वातील सैन्यांना रसद पुरवली जात होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विभागाचे निमंत्रक लीजे गर्नाड यांनी सांगितले की, अल मसुब भागात सौदीने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 31जण ठार झाले असून जवळपास 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या