सौदी अरेबियाकडून जादूटोणा करणाऱ्या चार जणांना फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्ध सौदी अरेबियाचा विजय साजरा होत असतानाच देशाच्या मानवी हक्कांवर काळी छाया पसरवणारी घटना घडली. 12 वर्षांपूर्वीपासून सौदी अरेबियाने जादूटोणा आणि चेटूक केल्याच्या संशयावरून काही जणांना फाशीची शिक्षा दिली. 2011 ते 2014 या कालावधीत जादूटोणा आणि चेटूक करण्यात सहभाग असल्याच्या कारणावरून चार जणांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या कायद्याच्या नियमानुसार करण्यात आल्याची माहिती मिळाली होती तसेच या चार हत्या सार्वजनिक ठिकाणी प्राचीन जादूटोणा पद्धतींचा वापर करून करण्यात आल्या होत्या.

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डीरा चौकात यापैकी पहिली हत्या सप्टेंबर 2011 साली करण्यात आली होती. मुरी अल-असिरी नावाच्या सुदानी व्यक्तिने जादूटोणा आणि चेटूक करून सार्वजनिक ठिकाणी हत्या केल्याचे दृष्ट पाहिले होते. या चौकात मोठ्या प्रमाणात व्यक्तिंना पायदळी तुडवून मारण्यात आल्याने या हत्यांकाडाला ‘चॉप-चॉप स्क्वेअर’ असे टोपणनाव ठेवण्यात आले. डिसेंबर 2011मध्ये जादूटोणा आणि चेटूक करून एका महिलेची हत्या करण्यात आली होती. अमिना बिंत अब्दुल हलीम बिन सालेम नासेर या महिलेचा ज्वार्फ प्रांतात शिरच्छेद करण्यात आला. तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल अधिक तपशील दिलेला नाही.

त्यानंतर पुढच्या वर्षी जूनमध्ये मुरी बिन अली इसा अल-असिरी यांच्या पुस्तके आणि तावीज असल्याचे आढळल्याने तिचा शिरच्छेद करण्यात आला होता. याबाबत सौदी येथील स्टेट न्यूज एजन्सी एसपीएने सांगितले की, त्याने केलेल्या व्याभिचाराची कबुलीही त्याने दिली होती. त्यानंतर 5 ऑगस्ट 2014 रोजी मोहम्मद बिन बकर अल-अलावी या चौथ्या व्यक्तिला जादूटोणा केल्याबद्दल फाशी देण्यात आली होती.

याबाबत सौदी अरेबियातील फाशी देणाऱ्यांचे प्रमुख मुहम्मद साद अल-बेशी यांनी सांगितले की, ‘मी तलवारीचा वापर न करता धारदार चाकूचा वापर करतो. एक हात सांध्यापासून कापला.’ हे सांगून ते म्हणाले की, ज्यांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे, अशा कैद्यांना जेव्हा फाशी देण्यात येणाच्या जागी एका चौकात नेले जाते तेव्हा त्यांची शक्ती कमी होते. त्यानंतर फाशीचा आदेश वाचण्यात येतो आणि एका विशिष्ट ठिकाणी त्यांचा शिरच्छेद केला जातो. सौदी अरेबियात कायदे मोडणाऱ्या लोकांना डोळे काढणे, दात खेचून काढणे, अर्धांगवायू यासारख्या शिक्षा दिल्या जातात.