सौरभ चौधरीचा विश्वविक्रमासह ‘सुवर्ण’वेध, जागतिक नेमबाजी स्पर्धा

34

सामना ऑनलाईन । चँगवॉन (दक्षिण कोरिया) 

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता हिंदुस्थानचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मुलांच्या कनिष्ठ गटात गुरुवारी नव्या विश्वविक्रमासह ‘सुवर्ण’वेध साधला, मात्र हिंदुस्थानच्या वरिष्ठ नेमबाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. अर्जुनसिंह चिमाने याच स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली, तर सौरभच्या वैयक्तिक चमकदार कामगिरीमुळे हिंदुस्थानी संघाला रौप्यपदक मिळाले.

सौरभ चौधरीने 581 गुणांची कमाई करून तिसर्‍या स्थानासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र अंतिम फेरीत त्याने 245.5 गुणांसह स्वतःचाच विश्वविक्रम मोडून नव्या विक्रमाला गवसणी घातली. दक्षिण कोरियाच्या होजीन लीमला 243.1 गुणांसह रौप्यपदकाकर समाधान मानाके लागले, तर चिमाने 218 गुणांची कमाई करून कास्यपदक जिंकले.

आपली प्रतिक्रिया द्या